इनकम टॅक्स रिटर्न भरताना ‘या चुका टाळा, अन्यथा येऊ शकतात अडचणी
केंद्र सरकारनं १३ मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली ३१ जुलैपर्यंतची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) त्यावेळी असं म्हटलं होतं की, करोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या कालावधी वाढवण्यात येत आहे. त्याला पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे करोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना दिलासा देत ही तारीख ३१ डिसेंबर अशी निश्चित केली.
ज्या करदात्यांकडे उत्पन्नाचं साधन पगा आहे आणि ज्यांच्या नावावर मालमत्ता आहे, त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे खूप सोपे आहे. ते सहजपणे आयटीआर-१ दाखल करू शकतात. परंतु, जे करदाते ITR-2, ITR-3 किंवा ITR-4 द्वारे रिटर्न भरतात त्यांची प्रक्रिया किचकट असते. आयकर विभाग गेल्या काही वर्षांपासून कर नियमांमध्ये सातत्याने बदल करत आहे, त्यामुळे करदात्यांच्याकडून आयटीआर भरताना काही ना काही चुका होतात. त्यामुळे करदात्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आयटीआर दाखल करताना काही सामान्य चुका तुम्ही कशा टाळू शकता ते आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
फॉर्म 26AS काळजीपूर्वक भरा..
आयटीआर भरताना करदात्यांनी नेहमी फॉर्म 26AS दोनदा तपासावा. यामध्ये व्यक्तीचे उत्पन्न, टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स (टीडीएस), अॅडव्हान्स टॅक्स पेड, सेल्फ असेसमेंट टॅक्स पेड इत्यादी माहिती भरली जाते. सर्व पगारदार लोकांनी एम्प्लॉयरच्या फॉर्म 16 आणि फॉर्म 26AS मधून त्यांची माहिती तपासली पाहिजे.
अपूर्ण किंवा चुकीचे बँक तपशील भरू नका..
चुकीची बँकेची माहिती भरणं ही सामान्य चूक आहे. अपूर्ण किंवा चुकीचे बँक तपशील भरल्याने आयटी विभागाला तुमच्या बँक खात्यात रक्कम परत करणे कठीण होते. पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. त्यामुळे वेळेत रिटर्नचा दावा करण्यासाठी, तुमचा बँक खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव आणि IFSC कोड बरोबर असल्याची खात्री करा.
ज्या उत्पन्नावर सूट आहे त्याचा उल्लेख करा..
बऱ्याचदा असं होतं की, करदाते करमुक्त उत्पन्नाचा उल्लेख करत नाहीत. उत्पन्न करपात्र नसल्यामुळे त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही, असे त्यांना वाटते. पण तसं नाहीये. जर करदात्याचे एकूण उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला आयटीआर भरावा लागतो.
दोनपेक्षा जास्त मालमत्ता असल्यास त्याचा उल्लेख करा..
ज्यांच्याकडे दोनपेक्षा जास्त मालमत्ता आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीत, त्या सर्वांनी त्याचा उल्लेख करावा. प्राप्तिकर कायदा, १९६१ मधील सुधारणेनुसार, आता दोन मालमत्तांवर self-occupiedचा दावा केला जाऊ शकतो. जरी मालमत्ता वर्षभर खाली असेल आणि कोणतंही उत्पन्न मिळालं नसेल तरी ती करपात्र आहे.
Read More : File your Income Tax Return FREE
Read More : GST+ Income Tax + TDS Practical Training with JOBs